STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

4  

AnjalI Butley

Abstract

लतिका

लतिका

1 min
369

सक्षम जीवन जगतांना

घेतली काळजी अनेंकांची

अनेकांची घेता घेता

झाडा सारखी पसरली


देत गेली जवळचे

जे होते सर्वकाही

कधी रीते झाले

कळलेच नाही मला


कधी बनली लतिका

मिळतो का आधार झाडाचा

फुलण्या बहरण्यास मला

ह्या आयुष्याच्या सांजवेळी?


सतत भेडसावत राहतो

हा असुरक्षितेचा भाव

असेल का मी 

तेवढीच सक्षम जगण्या?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract