## Love कविता - तूच माझे प्रेम
## Love कविता - तूच माझे प्रेम
## LOVE
तूच माझे प्रेम सखे
विसर दुःखाचा मज पडे...
सावरते तूच मजला
तुजवरी बघ प्रीत जडे....!
आठवणीत तुझ्या हरवणे
हा छंद गोड नवा जडे
पहातो पून्हा पुन्हा फोटो
नव्याने मग प्रीत जडे ..!
ओठावरती नाव तुझे
डोळ्यात या स्वप्न वेडे
आठवणीत तुझ्या सखे
मन झाले बघ पार वेडे ....!
तू सांग तुझ्या या वेड्याला
तुझेही खूप प्रेम आहे यावरी
बघ जादू प्रेमाची कशी असते
तूच म्हणशील झालो दोघे वेडे..!