लॉकडाऊनमधली रेसिपी
लॉकडाऊनमधली रेसिपी
लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त
वेळच वेळ जात नव्हता तोही झालेला सुस्त
त्या दिवशी नवीन काही तरी करण्याची सुचली मला खुमी
ठरवलं ट्राय करू नवीन एखादी रेसिपी
इंटरनेट सर्फिंग चालू केलं
एकापेक्षा एक रेसिपीचे दर्शन घडलं
व्हेज-नॉन व्हेज आणि बरंच काही
सुचेना कोणती रेसिपी निवडावी
सगळ्याच दिसत होत्या भारी
पाककृती ही पाहून घेतली
सगळ्याच वाटत होत्या सोप्या
कोणती करावी होत नव्हतं कन्फर्म
डिशेस पाहत पाहत मला डुलकी लागली
त्या दिवसाची रेसिपी करण्याची इच्छा
मात्र तशीच राहिली
