STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

लॉकडाऊनची मज्जा

लॉकडाऊनची मज्जा

1 min
193

लॉकडाऊनचे वारे 

पसरले घराघरात,

करत रोज सगळे 

फरमाईश जोरात..१


जिभेचे चोचले अति भारी 

थांबत नाही अशा काळात,

असो महामारी वा संकट 

खवय्येगिरींची धमाल होत..२ 


घरी बसून खेळ चाले 

पत्ते, कॅरम,लुडो पसरे, 

अडगळीतले वस्तू निघे 

मनास गुंतून टाकी सारे..३ 


मोठे सारे लहान झाले 

छंद जोपासून मिळे मिसळे,

घरकामाची सवय जडली 

रूप बदलले घराचे सगळे..४


जरी पसरली महामारी 

घरी राहून मजा भारी, 

नकोत उगाच उचापती 

आपणच राहू सुरक्षित घरी..५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational