लॉकडाऊन
लॉकडाऊन


काय सांगू भाऊ तुम्हले
लॉकडाऊननी धमाल|
समद्यांस्न मास्क लाईसन
सुजीगयात म्हणे गाल||१||
ह्या लॉकडाऊनन्या पायरे
समद्यास्नी बुडी-हायनी शाया|
पगार पाणी व्हवाना करता
जो तो बठ्ठास्ले दी-हायना गाया||२||
लॉकडाऊन पायरे कोणले
धड खाता पिता भी ना येस|
हात धुईसन मास्क बदलीसन
समद्यास्ना तोंडले ई-हायना फेस||३||
रिकामं रिकामं बठीसन आठ्ये
जो तो फेसबुक पाही-हायना|
व्हाटसॲप देखी अन् वाचिसन
डोयाना नंम्बर बी बढी -हायना ||४||