लॉकडाउन (अभंग रचना)
लॉकडाउन (अभंग रचना)
कोरोना आजार | झाली महामारी I
चर्चा घरोदारी I रातोरात II १ II
विदेशी ते आले I विमाने भरून |
तो लॉकडाउन I मजुरांना ॥ २ ॥
चोपन्न दिवस | नाही ती दक्षता |
केली न कळता | घोषणा ती ॥ ३ ॥
थांबायचे कसे I एकविस दिन I
हलेचना पान | काही केल्या ॥ ४ ॥
घरात श्रीमंत | आरामात राही I
गरीब तो पाही | जमा पुंजी ॥ ५ ॥