STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

लोकशाहीगीत-संजय रघुनाथ सोनवणे

लोकशाहीगीत-संजय रघुनाथ सोनवणे

1 min
493


लोकशाही गीत-

गीतकार-संजय रघुनाथ सोनवणे

चला मर्दानों, चला बायानो

लोकशाहीला मतदान करू

चला युवकानो, भारत घडवू

लोकशाहीला सक्षम करू


नवीन बदल होऊ द्या, तुमच्या मतांनी

लोकशाहीस बळकट करू

नेहमीसारखे आता नका फसू

लोकशाहीचा इतिहास घडवू


नको आळस मतदानाचा

सर्व मिळूनी बाहेर पडू

शंभर टक्के मतदानासाठी

लोकशाहीचे उद्दीष्ट गाठू


नका संधी देऊ आता

निष्क्रीय लोकप्रतिनिधीला

उजाड केला त्यांनी भारत

अविकसित ठेवले देशाला


विकास कामे स्वतः पारखून

संधी द्यावी योग्य व्यक्तीस

संपवू या आपण कायमचे

हुकूमशाही आणि दडपशाहीस


निर्भिडपणे करा मतदान

नको कुणाची भीती कुणास

मताचे मूल्य आहे अनमोल

लोकशाहीची धरूनी कास


नको थारा आता व्याभिचाराला

मतदानातून धडा शिकवू या

भ्रष्टाचार आणि स्वार्थी राजकारणाला

भूतलात कायमचे गाडू या


जाती, धर्मावर नको मतदान

एकास संधी नको वारंवार

प्रत्येकाला संधी मिळावी

लोकशाहीचा करावाआदर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational