लिहितांना तुझ्यासाठी
लिहितांना तुझ्यासाठी
प्रेम केले तुझ्यावरर्ती
दुनियेला ते काय कळे
लिहितांना तुझ्यासाठी
डोळ्यांतले थेंब गळें
हेंच डोळे काजळाचे
पाहतांना जीव जळे
गोऱ्या गोऱ्या गलावरर्ती
चांदण्याची झिल खळे
पायातले पैंजण झुले
चालतांना बळ मिळे
ओठातले पळस वल्ले
लाल झाले तुझ्यामुळें
ये नां राणी बांदावरर्ती
मेघ मातीला ग जुळे
झड होऊनी श्रावणाची
डव्हाळू दे प्रेम तळे

