लहरी
लहरी
सागराएवढं दुःख
दुःखात सागर
मिळेना सुख
रिकामी घागर
लाटा पोहचल्या
वादळ होऊन
शिंपल्यांना उचलल्या
आभाळ भरून
एक लाट
आकस्मित भरली
धुरकट वाट
खडकात बसली
अनेक सरींच्या
वाटा मोकळ्या
उसळलेल्या लहरींच्या
उरल्या पोकळ्या
आवाज घुमुन
आला परत
लहरी दमून
नाहीत परतत
