STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

4  

Kshitija Kulkarni

Abstract

कर्म

कर्म

1 min
30

किती आढे वेढे
या मानसिकतेचे
असले कसले पाढे
 या कर्माचे

 आयुष्याच्या वळणावरचे
 अगणित प्रकार
 बंद जीवनाचे
 अनोखे दार

 सारे सरले
कुठल्या कुठं
 कर्तव्य उरले
निखळले काठ

 दोहोंच्या कात्रीत
 काय राहिले
धगधगत्या दरीत
 मनास घेरले

 इरून फिरून
 भावनेच्या भरात
 ठेविले सांभाळून
कर्माला कर्तव्यात

 सौ क्षितिजा कुलकर्णी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract