STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Abstract

3  

swati Balurkar " sakhi "

Abstract

लेखणी

लेखणी

1 min
331

मनाविरुद्ध घटना होत जातात,

हतबल होतो जीवनापुढे

कधी कधी उलटते परिस्थिती,

तर कधी अगतिकता, अकल्पनीय

षडयंत्रच विधात्याचे, फासे टाकतात!


आत्म्यांची होते तडफड

अनेक कारणांवरून जेव्हा

तगमग ती सोसवत नाही

तेव्हा भावना बनतात शाई

अन् शब्दरूपी लेखणीतून प्रसवते

एक अप्रतिम कविता... अलगद!


आत्म्याला मिळते तृप्तता अनोखी

अन् कागदही सुखावतो लेखणीला पाहून!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract