STORYMIRROR

kishor zote

Action

3  

kishor zote

Action

लेखणी

लेखणी

1 min
14.5K


सत्यधर्माचा शोध

आसूड शेतकऱ्यांची

महात्मा पदावर असे

पोहचवणारी लेखणी

वारणेचा वाघ 

मुंबईच्या मैनेची

लोकशाहीराची 

साहित्यसम्राट लेखणी

वृक्षवल्ली साजरी

तुकोबांच्या नावाची

अभंगी रंगली

संताची लेखणी

आज्ञापत्रे लिहती

आरक्षणही देती

राजे अन् शाहूंची

समानतेची लेखणी

स्वतंत्र भारताला

साथ संविधानाची

असे बाबासाहेबांची

स्वाभिमानी लेखणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action