STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance

2  

Arun V Deshpande

Romance

लावण्यवती

लावण्यवती

1 min
15.3K


पाहूनी माझ्यासावे तुजला 

मज भेटुनी दोस्त विचारती 

लेका हेवा वाटे रे तुझा ,सांग 

कोण लागे रे लावण्यवती ?

म्या पामराचे नशीब थोर 

मेहेरबानी तुझी ग झाली 

भले भले पडले कोड्यात ते 

ही सुंदरी याला कशी मिळाली ?

म्हणाली तू एकदा, तुझ्यातल्या

कलावंताची मी निस्सीम चाहती 

रंगात तुझ्या विरघळून गेली 

आता तुझी सखी ही लावण्यवती 

नजरेतले प्रेम तू ओळखले 

चित्रकारास तुझा सखा मानिले 

ना मनात माझ्या .ना मनात तुझ्या 

न विकृती -ना आसक्ती हे लावण्यवती 

जग वेगळे ,मी - तुही जगावेगळे 

नाही कळणार सखे जगास या 

तुझी माझी ही वेगळी प्रीती 

हात माझा हाती तुझ्या हे लावण्यवती ...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance