लावण्यं
लावण्यं


रूप तुझे हे जगा वेगळे
मनास माझ्या घाली साकडे
दंग होवून टकमक पाहती
मम डोळे हे जुलमी गडे
ऊन कोवळे स्मित करूनी
देहास या रोमांचित करते
थेंब जरासे उडवून केसांचे
ह्रदयास का घायाळ करते
स्वप्न रुपेरी दिवसा पडावे
इपरीत हे सांग का घडावे
वेलीने झाडास कुरवाळावे
झाडाने तरी सांग का झुरावे
फुलं कोवळे दिसता सुगंधी
भ्रमराने भोवतीचं फिरावे
प्रेमात पडावे होवून वेडे
लावण्यं असे सांग का पहावे