लाटा किना-याच्या
लाटा किना-याच्या
शीर्षक लाटा किना-याच्या
लाटांमागुनिया लाटा येती
कशा भिरभिरत...
फुटती उसळती वेगे
किनारा कुरवाळे प्रेमरत...
ओहोटी भरती निसर्गचक्रचि
सागर मनीमानसी.....
भरतीला वेगे धावे भेटीसी
ओहोटीस आत जाई.....
लाटांवरी लाटा उच्छ्रुंखल
आनंद अतुलनीय.....
डौलाने डुलती मौजेने
यौवनलीला अवर्णनीय......
सूर्य चंद्र अन् सागरलाटा
नेमस्त असती जगतात....
चंद्रकलांचे नाते जवळचे
उचंबळोनी झेप घेती नभात...
