लाल
लाल
गुलाबाचा लाल रंग,
मला हळूच काही सांगतो,
त्याच्या मनातील भावना,
मजकडे येऊन मांडतो...
प्रेमाचे प्रतीक बनून,
लाल रंग सर्वत्र नाचतो,
प्रेमाच्या वर्षावाने तो,
ह्या सृष्टीस न्हाऊ घालतो...
खरंच माहित नाही मज,
का हा रंग भावतो,
हळूच पाठीमागून येऊन,
'तो' मला हाच रंग लावतो...
लाल रंगात रंगवून मजला,
तो हळूच पटवू पाहतो,
माझी एक नजर पडताच,
गालातल्या गालात लाजतो...
ह्या लाल रंगाने आम्ही,
निःशब्द संवाद साधतो,
जन्मजन्मांतरीचे नाते,
'लाल' पोशाखात जोडतो

