STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

2  

Shital Yadav

Inspirational

लाभले आम्हां भाग्य

लाभले आम्हां भाग्य

1 min
13.9K



लाभले भाग्य

माय मराठी मातीत

विविध जातीत

एकतेचे


संतांची भूमी

संस्कृतीचा इथे ठेवा

वाटतो हेवा

इतरांस


शिवबाच्या प्रतापाने

धन्य मराठा जाहला

साक्षी ठरला

इतिहास


ऐकतो गाथा

माय मराठी भाषा

सीमेपार रेषा

कर्तृत्वाच्या


शोभते मराठी

जशी खाण अमृताची

मराठमोळ्या लोककलेची

अभिजात


अभिमान मराठीचा

वाहे आमुच्या नसानसातून

गीत काव्यांजलीतून

समर्पण


झेंडा महाराष्ट्राचा

फडकत राहिल गर्वाने

सूर्याच्या तेजाने

अखंडित



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational