कवियत्री
कवियत्री
अबोली मना
भावली कविता
शब्द आखिता
ओवीत जना
मौनाची भाषा
कळली ती शांता
काव्यात ओतता
चमके आशा
फुल मुलाची
गाते कोमलता
ती इंदिरा संता
मुक्ता कलाची
संत मुक्ताई
शब्दाची ग धनी
ज्ञान दिले ज्ञानी
ओवीत गाई
अखंड चाली
वारसा हक्काने
कवी संस्काराने
आयुष्य पेली
संसार मेरू
समजुनी सांगी
संत बहिणाई
सूपंथी गेरू
आजची पिढी
नाही मागे जरी
कवियत्री खरी
उभारी गुढी
संस्कारा मेरू
ओवीत ग माळू
द्वैष राग गाळू
सत्संग धरु
कवियत्री ती
गुणाची ग खरी
सांगड संसारी
ज्ञानगात्री ती
