Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

ANJALI Bhalshankar

Abstract

4.0  

ANJALI Bhalshankar

Abstract

कवितेचे सामर्थ्

कवितेचे सामर्थ्

1 min
200


नसेल इतरांच्या नजरेत माझी कवितां दर्जेदार,

मी सदैव मानते तिचे आभार

माझ्या अंतरात दडलेल दुःख बाहेर काढण्याचे

सामर्थ्य फक्त माझ्या कवितेत आहे .... 1


श्वास कोंडतो भ्रष्टाचार, ऊपासमार, दंडेलशाही बलात्कार,

जातीयवाद, उन्मत्त राजकारणी शेतकरयाचंया डोळयात पाणी... 2

   

आंधळे शासन नोटांच्या तालावर नाचणरे प्रशासन

काय काय पहायच सभोवती .

डोळयातले अश्रू दडवायचे.

आतलया आत साठवून कुठवर रडायचे. 3

   

सक्षम सशक्त, कणखरतेचा बुुरखा पांघरलयाशिवाय,

चेहेरया भावनाशून्य निरविकारता,

स्त्री ला जगणं अशक्यच ईथे.

तिच्या अश्रूंना लाचारीची झालर देणारे

आणि ऊसनी आपुलकी दाखवणार ईथे खुप भेटतात .4


 कविते तुुझ सार कस स्वच्छ निस्वार्थी.

म्हणुनच कविते, मला तुझा आधार मोठा वाटतो. 5


तू अबोल तरीही माझ्याआंक्रदनला,गहिवरलया नेमकी हेरतेस .  

रोजच्या जगणयातलया भलयाबुरया अनुुभंवाना एकटेपणी शब्दांची ऊब देेतेस.

भरून आलेल सार मन पानांवर रित करतेस

शब्दांना कणखर धार आणतेेेस.

नव्या दिवसाच्या नव्या प्रश्नांना सामोरे जाया नवी ऊर्जा देतेस... 6


नाही! कोणीही माझ्या कवितेची समीक्षा करण्यची गरज नाही.

कारण या मूरदाड दुनिये तून स्व:ताला वजा करताना तुच मला रोखलस

यापेक्षा जास्त अपेेक्षा तुझ्या कडून मी काय करू

तुझ्या उपकाराांची परतफेड मी कोणत्या स्वरूपात करू.  7


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract