STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

कविता

कविता

1 min
299

।।प्राण जाये पर ना जाये वचन।।


वचनात कोणी कुणाच्या

फसू नये वचन देऊन 

आयुष्यभर वचन जपावे 

लागत असते साहून।।


वचनात कधी अडकले होते

राजा दशरथ कैकईच्या

म्हणुन रामाला झाला होता

वनवास चवदा वर्षाचा या।।


त्यागले सुख सर्व रामाने

पित्याच्या वचनाला जागून

राजकुमार होता अयोद्धेचा

 राहिला दंडकारण्यावन।।


लक्ष्मनाने वचन तोडले रामाचे

लक्ष्मनरेषा आखुन देखिल 

पळविली सितेला रावणानी

अन् भोगावी लागली फळ।।


वचनांची ही महा परंपरा

लक्षात असू द्यावी जना

भारताची संस्कृती आहे

प्राण जाये पर ना जाये वचन।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational