STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational Others

3  

Manisha Patwardhan

Inspirational Others

कविता

कविता

1 min
33

वृत्त... मालिनी


ल ल ल ल ल ल गा गा गा ल गा गा ल गा गा


चमकत बिजली येई नभातून वेगे

गरजत बरसे पाऊस, वाराच संगे


झरझरझर वेगे, डोंगरी नीर वाहे

चमकून मन माझे गे, अचंबून पाहे


नजर न ढळली माझी स्फटीकावरूनी

नकळत किमया ऐशीच केली गं कोणी


सरसरसर सर्पा वीण, वाहे सरीता

झरझरझर चित्ती, मी लिहीते कविता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational