STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

3  

Vijay Sanap

Inspirational

कविता

कविता

1 min
27.7K


हिंमत नव्हती गुरु माझ्यात

सारं बळ तुमच्या मुळं आलं

एवढे रस्त्याचे काटे तुडवत

आलो कसा मला न कळलं ।।

गुरु तुमची साथ म्हणूनच

मी मोठं धाडस केले होतं

नाही कधी सोडली साथ

तिला हृदयात भरलं होतं ।।

पाठीवर होता हात तुमचा

न घाबरता गेलो मी दारात

सावकाश तिला पुकारलं

तेव्हा तीच नव्हती घरात ।।

गुरू फारच भाळलो होतो

मी तिच्या सुंदर चालीवार

केले मी प्रयत्न शब्दरूपी

अन् ती भडकली माझ्यावर ।।

तिला मिळवण्यासाठी गुरु

देवाला मी ठेविले पाण्यात

कोण जाणे कुणास ठावूक

कसा पोहचलो तिच्या दारात ।।

आता मला जडलीय संगत

तिच्या सरळ चांगुलपणाची

तिनेही दिली साथ मजला

आपल्या मोकळ्या मनाची ।।

गुरु तुमचीच आज्ञा पाळून

करी पूजन ज्योती लाविता

मुखाने तिचा गातो गोडवा

तीच माझी प्यारी कविता ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational