कविता - तो पाऊस
कविता - तो पाऊस
तिच्या साठी आहे,
पाऊस म्हणजे सर्वस्व,
पाऊस आहे अस्तित्व,
भिजताना आकारते
देहभानास पूर्णत्व
त्याच्या साठी मात्र,
पाऊस म्हणजे नकोसा,
सहवास तिचा हवासा,
सदा नाकारी फिरण्यास,
ना आवडे भिजण्यास,
तिला आवडे हिरवळ,
वाटे त्यास घाणीचा दरवळ
पाऊस म्हणजे चिकचिक,
तिच्यासाठी मात्र पिकनिक
ओलेती मिठी तिज साठी
नाईलाज त्याचा पोटासाठी
पावसाच्या तुषारासाठी,
धडपड तिची झेलण्यासाठी
ती अशी पाऊस वेडी
काढी त्याची खोडी,
तो मात्र सदा नाराज
पाऊस प्रेमावर नाईलाज

