STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

कविता माझी ओळख

कविता माझी ओळख

1 min
260

कविता माझी ओळख

कविता माझी पारख

कविता माझे विचार

कविता कल्पनांची ठकठक


माझी कविता माझा श्वास

माझी कविता माझी आस

माझी कविता माझा ध्यास

माझी कविता माझा जीवनप्रवास


कवितेने दिली साथ 

केली सोबत एकटेपणात

बोलू लागली लेखणी कागदाशी

मनातले वादळ उमटले कागदावर क्षणात


लेखणी प्रिय भारी मजला त्यामुळंच

माझी कविता माझी ओळख बनली

कळलंच नाही कधी मी कवितेची

अन कविता माझी प्रिय सखी झाली



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational