STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

3  

Prashant Shinde

Fantasy

कविता..लिहिताना...!

कविता..लिहिताना...!

1 min
825


कविता लिहिताना

अवघड शब्द

माझी गोची करतात


नको त्या वळणावर

उगाचच मुद्दाम

गर्दी करतात


कधी कधी

शत्रू बनून

रुसून बसतात


कधी कधी तर

मैत्रीचं सोंग घेऊन

माझी फिरकी घेतात


आज साऱ्यांनाच

मी धडा

शिकवायचं ठरवलं


एकाही अवघड शब्दाला

कवितेत घ्यायचं नाही

हे पक्के केलं


आणि


काय चमत्कार बघा

सारे अवघड शब्द

बाजूला राहून पाहू लागले


पहाता पहाता

कवितेचे रूप साकारताना

तोंडात बोट घालून उभे राहिले


कविता हसली माझी

तिला खूप आनंद झाला

कवितेचा सोपस्कार पार पडला....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy