STORYMIRROR

Manisha Awekar

Romance

3  

Manisha Awekar

Romance

कवीची स्फूर्तीदेवता

कवीची स्फूर्तीदेवता

1 min
148

छमछम पैंजण वाजवत, ठेक्यात आलीस

केसात मोगरीचे गजरे माळून आलीस

आशा आकांक्षांचे हार घेऊन आलीस

माझ्या प्रसन्न मनात हक्काने राहिलीस


हसरे स्मित गाली घेऊन आलीस

डोळ्यांत लाजरी प्रीत घेऊन आलीस

ओठी मुग्ध प्रिती ठेवून आलीस

मन हिंदोळ्यावर विराजमान झालीस


फक्कड माझा मूड, तू केलास झकास

कवितांवर कवितांची होऊ लागली पैदास

कवी म्हणून मान्यता पावलो आज

प्रसिद्धीच्या झोतात शिखर गाठले खास


अनंत उपकार तुझे मजवर राणी

माझ्या प्रतिभेची तू स्फूर्तीदायिनी

झालो जरी मी मान्यताप्राप्त कवी

मला तू नेहमीच हवी हवी


अशीच रहा मजजवळ नेहमी

मी आहे हळवा गं कवी

स्फुरती काव्य प्रतिभेतूनी

साथ तुझी जन्मोजन्मी हवी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance