कुटुंब...
कुटुंब...
एक धागा गुंफुन ठेवी अनेक फुलांना....
त्यामुळेच बनतो सुंदर असा हार,गजरा.
कुटुंब ही असे एक धागा...
जो बांधून ठेवी नात्यांना...
कुटुंब लहान असो की मोठे...
इथे ऐकू येतात एकमेकांच्या हृदयाचे ठोके.
असे हे एकत्रित कुटुंब,
जिथे दिसे प्रत्येकाला स्वतः चे प्रतिबिंब..
पशू पक्षीस ही असे कुटुंबाचे महत्त्व...
मग मनुष्य का रे तु,
विसरत चालला आहे कुटुंबाचे सत्व....
त्या कुटुंबामुळेच आहे तुझे अस्तित्त्व.
करू साजरा आज जागतिक कुटुंब दिन...
ओळखू कुटुंबियांचे मन....