STORYMIRROR

सुरेश पवार

Inspirational

3  

सुरेश पवार

Inspirational

शेवटी माझा माणूस

शेवटी माझा माणूस

1 min
227

दर्शन घडले आज मितीला,

सावट आला कोरोनाचा,

बंद झाले देवालये,

शेवटी देव दिसला मानवाचा.।।।१।।।


डॉक्टर रुपी केली मदत,

किती लोकांना दिला आधार,

तोचि माझा देव,

माझ्यातला परमेश्वर आहे उद्धार.।।।२।।।


लाकडाऊन झाले भारताचे,

सारी यंत्रणा जागेवर थांबली,

हाल झाले माझ्या गोरगरिबांचे,

उपाशी पोटी गरिबी हारली.।।।३।।।


माझ्यातला परमेशवर जागा झाला,

विचारपूस केली घरोघरी जाऊन,

मायपाब माझा माणूसच देव झाला,

तोचि माझा परमेश्वर आला धावून.।।।४।।।


मंदिर मस्जित गुरुद्वारा,

नाही ऐकली कोणाची तक्रार,

माणूसच माणसाला भेटला,

धीर दिला म्हणून जगलो आजवर.।।।५।।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational