मन:स्थिती
मन:स्थिती
माणसाने जीवन कसं जगावं?
कुणी म्हणेल आम्ही का सांगावं?
हे ज्याचं त्यानं ठरवावं
कुणी म्हणतं असं जगावं
कुणी म्हणतं तसं जगावं
पण हे मनाला का कळत नसावं?
कुणी म्हणतं मनसोक्त जगावं
कुणी म्हणतं मस्त जगावं
मनालाच मनसोक्त, मस्तचा
अर्थ का न समजावं?
असं वागलं तर काय होईल?
तसं वागलं तर काय होईल?
या घालमेलीतच काय जीवन जगावं!
कुणी म्हणतं मनासारखं जगावं
जगाचा विचार का करावं?
असा विचार करण्यात
अंत:काळ जवळ येतं
अजूनही मन कसं जगावं
याचा विचार करतं
चांगलं वागणं म्हणजे काय?
वाईट वागणं म्हणजे काय?
मन स्वतःलाच विचारतं
विचार करूनच जगायचं
अन विचार करूनच मारायचं
हेच सार्थक जीवनाचं!
हेच सार्थक जीवनाचं!!
