योगायोग की नशीब?
योगायोग की नशीब?
सर्वांच्याच नशिबी आई-वडील असतात---
पण नशीब ज्याचे त्याचे !
कुणाला साथ जन्माची,
तर कुणाला विरह जन्माचा !!
सर्वांच्याच नशिबी मित्र असतात---
पण नशीब ज्याचे त्याचे !
कुणी मित्रत्व निभावतात,
तर कुणी खंजीर खुपसतात !!
सर्वांच्याच नशिबी सुखदुःख असतात---
पण कर्तत्व ज्याचे त्याचे !
कुणी दुःखात ही सुख मानतात,
तर कुणी दुःखात होरपळतात !!
सर्वांच्याच नशिबी भोग असतात---
पण कर्म ज्याचे त्याचे !
कुणी भोगाला योगायोग मानतात,
तर कुणी संधी समजतात !!
सर्वांच्याच नशिबी एक संधी असते---
पण योग ज्याचा त्याचा !
कुणी दुसऱ्या संधीची वाट पाहतात,
तर कुणी संधीचं सोनं करतात !!
सर्वांच्या नशिबी कधीतरी सुख येते---
पण भाग्य ज्याचे त्याचे !
काहींना मिळतं ओंजळभर,
तर काहींना रांजणभर !!
सर्वांच्या नशिबी भव सागर असतो---
पोहायचे ज्याचे त्यांनी !
कुणी लाटेत वाहवून जातं,
तर कुणी ओहोटीची वाट पाहतो !!
