विरह
विरह
1 min
186
विरह वारा मनाला चाटून गेला,
व्यथा तुझ्या मनाची सांगून गेला!
त्या क्षणाच्या पांनासवे, तो खेळत आहे!
विरहाची जाणीव, सळसळत आहे!
झुळुक वेदनांची स्पर्शून गेली,
मम भावनांची घालमेल झाली!
वादळ उठले आठवणींचे,
अंतरंग ढवळून गेले!
काहूरात तर्काच्या,
पुरते गोंधळून गेले!
विरह हा आता मज साहवेना,
सख्या तुजवीन आता राहवेना!
तुझीही गत अशीच झाली असेल का रे?
माझे मन मलाच विचारीत आहे,
मिलनाचा मार्ग शोधत आहे!
