शून्यात
शून्यात
1 min
209
जगणे म्हणजे काय?
मज कळलेच नाही!
अन् कळले तेव्हा
हाती कांही उरलेच नाही!!
नाते मज काही,
समजलेच नाही!
समजले तेव्हा,
काही उमजलेच नाही!!
व्यवहारात अन्याय,
झालाच नाही!
असे काही म्हणता,
येणार नाही!!
न्यायात अन्याय,
झाकून गेला कदाचित!
अन्यायाची भाषा,
समजलो न कदाचित!!
निस्वार्थामुळे स्वार्थ,
कळलाच नाही!
पाप पुण्याचा विचार,
कधी केलाच नाही!!
सरळ मार्ग कधी,
सोडलाच नाही!
म्हणून काही प्रपंच,
मी केलाच नाही?
प्रेमाची जाणीव जीवाला,
झालीच नाही!
म्हणून काय,
मी प्रेम केलेच नाही?
कोण अपुले, कोण परके,
उमजलेच नाही!
म्हणून काय,
नात्यात गुंतलोच नाही?
या गुंत्याच्या पाशात अडकून,
जीवनाचा अर्थ, शोधितो मी!
आहे मी ही बापडा मानव,
किंकर्तव्यमूढ मानितो मी!!
