शोध
शोध
1 min
198
दुःखात सुख शोधतो मी,
अन्नातच भूख शोधतो मी!
कामात घाम शोधतो मी,
घामातच तृप्ती शोधतो मी,
रागात प्रेम शोधतो मी,
प्रेमातच जिव्हाळा शोधतो मी!
भांडणात समेट शोधतो मी,
हृदयातच भेट शोधतो मी!
नात्यात रक्त शोधतो मी,
रक्तातच श्वास शोधतो मी!
शिक्षणात ज्ञान शोधतो मी,
ज्ञानातच विज्ञान शोधतो मी!
शत्रूत मित्र शधतो मी,
मित्रातच जीव शोधतो मी!
जीवात भाव शोधतो मी,
भावातच देव शोधतो मी!
माझाच मला शोधतो मी,
शून्यातच "स्व"ला पाहतो मी!
शोधता शोधता मीपणा हरवतो मी,
मीपणातच "मी"ला शोधतो मी!
