STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Inspirational

3  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

आई तुझा आशीर्वाद

आई तुझा आशीर्वाद

1 min
1.6K

आई तुझा आशीर्वाद, 

ठेव सदा आम्हावरी। 

तुझ्या मायेने मिळते, 

भुकेल्याला ती शिदोरी॥ 


तुझे तेज नमविते,

तुच जगाची सावली। 

तुझ्या दर्शनाने माते,

सर्व मनं आनंदली॥ 


तुला लोकं पुजतात,  

तुझी शक्ती आदि माया। 

तुझा आशिष सर्वाना, 

ठेव सुखी सर्व काया।।


तुझ्या कुशीत जीवन, 

राहे सुखरुप सारे। 

मज लाभे तुझी शक्ती, 

जीवनात थंड वारे॥ 


तुझा आशीर्वाद आई, 

नित्य सोबत राहू दे। 

तुझे सुंदर ते रुप, 

मला नेहमी पाहू दे।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational