STORYMIRROR

daivashala puri

Inspirational

3  

daivashala puri

Inspirational

माय मराठी

माय मराठी

1 min
228

माझी मराठी गोजिरी 

जसं बाळ लडिवाळ 

जन्मोजन्मी जोडलेली 

माय मराठीशी नाळ 


काना, वेलांटी, उकार 

शब्द सौंदर्य आगळे 

पाना फुलांत इथल्या 

गंध तोची दरवळे 


जनाईची ओवी गोड 

तुकारामाचे अभंग 

मंदिरात भूपाळीचे 

स्वर करी मना दंग 


कोसा कोसाला बदले 

मराठीची बोलीभाषा

शब्द समृद्ध करती

भाषेच्या या ज्ञानकोषा 

 

दोहे, भारूड, लावणी 

श्लोक, गौळणी, पोवाडे 

किती वर्णावा गोडवा 

शब्द पडती तोकडे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational