कुणितरी असावं
कुणितरी असावं
कुणीतरी असाव हळूच खोडी काढणारं
रागात पाहिलं की
विनवणीच्या स्वरात हळूच हसणारं
कुणीतरी असावं खदखदून हसवणार
भरलेच जर आसवांनी
तर डोळे पुसणारं
कुणीतरी असावं माझं म्हणता येणारं
जगासाठी परका झालो तरी
मला माझं म्हणणारं

