STORYMIRROR

Neha Sankhe

Fantasy Inspirational

3  

Neha Sankhe

Fantasy Inspirational

कुणीतरी येईल आणि सावरून घेईल

कुणीतरी येईल आणि सावरून घेईल

1 min
137

अजून किती अन्याय सोसत रहायचं,

कुणीतरी येईल या आशेवर जगायचं,

हे कलयुग आहे इथे स्वतःच लढायच असतं,

अन्यायाविरुद्ध नीडर होऊन भिडायच असतं,

स्वतःचं अस्तित्व इथे स्थापित करायचं असतं.


स्त्री आहे म्हणून सहनशील असावं असं नाही, 

सगळंच दुःख एकटीने सोसावे असं काही नाही,

तिलाही स्वतःच मत असावं, 

जबाबदाऱ्या तर आहेतच पण थोडं स्वातंत्र्य ही असावं,

सर्वांसाठी जगताना स्वतःसाठी ही थोडं जगावं. 

 

स्त्री स्त्री मध्ये कुठेच इर्षा नसावी,

पुरुषी समाजात स्त्री लाही एक वेगळी जागा असावी,

कोणीच नाही येणार तुम्हा सावरायला,

स्त्रीलाच लागणार आहे स्वतःला आवरायला,

समाजाला समजवायचंआहे आता स्त्री शक्तीचा जागर.


जिजाऊ ची शिकवण विसरून चालणार नाही,

आपण सावित्रीच्या लेकी आहोत जिद्द हरून चालणार नाही,

अन्यायाला घाबरून पळून चालणार नाही,

आपल्या हक्कासाठी आपल्यालाच लढायचे आहे,

राणी लक्ष्मीबाई सारखा स्वतःला सिद्ध करायचं आहे.


हो आपल्याला ही मनासारखे जगायचे आहे,

कोणीतरी येईल आणि सावरून घेईल या मानसिकतेतून बाहेर पडायचे आहे,

हो मला ही मुक्त आयुष्य जगायचे आहे, 

मलाही मुक्त आयुष्य कायम जगायचे आहे....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy