STORYMIRROR

Neha Sankhe

Tragedy Fantasy

3  

Neha Sankhe

Tragedy Fantasy

शब्द

शब्द

1 min
129

मनामध्ये शब्दांची  

रेलचेल सुरू होताच  

मनातल्या कल्पनांची

शब्दरूपी सांगड तयार होते  


शब्दच सुचवतात 

शब्दच नाचवतात  

शब्दच हसवतात

शब्दच रडवतात  

शब्दच स्वप्नांच्या

दुनियेत घेऊन जातात  


मनातल्या कोपऱ्यातले

गुपित जपून ठेवतात  

भावना अनावर झाल्यास  

शब्दच साथ देतात  


शब्दांच्या या मायाजाळात  

कधी कधी मी अडकून पडते  

तर कधी तेच शब्द  

अडकलेल्या भावनातून बाहेर काढते  


गाढ विचारात कधी घेऊन जातात  

तर कधी निशब्द होऊन जातात  

किती तो तोरा मिरवतात  

पण जीवनातला आनंद टिकवतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy