STORYMIRROR

Neha Sankhe

Romance

3  

Neha Sankhe

Romance

धुक्यांची चादर

धुक्यांची चादर

1 min
137

पहाट होताच ती धुक्यांची चादर अंगणी पसरलेली

 जणू काही ढगांनीच एक मैफिल भरवलेली


 क्षितिजच जणू जमिनीला बिलगलेली

 भेट जणू ती काही खूप दिवसापासून राहिलेली


 आसुसलेले गगन जणू काही

 धरतीच्या त्या गंधात रंगून गेली


 मनमुराद आनंदाने जणू काही

एकमेकात गुंतूनिया गेली


 मंद सूर्यप्रकाश थंडगार हवेतील गारवा

 जणू काही त्यांच्या प्रीतीचे गाणे गाई


 झुळझुळणारे पाने जणू काही

 छेडी संगीताचे स्वर त्या क्षणी


 कावळा अंधार मंद प्रकाश

 साथ त्या दोघांची जणू काही


 निसर्गाने असिम कृपा त्यांच्यावरी केलेली

 धुक्यानी जणू त्यांच्यावर पांघरून घातलेली 

 

त्यात गुलाबी थंडीने मन फुलपाखरू झाले 

 दवबिंदूच्या त्या थेंबांनी सगळे न्याहून निघाले 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance