STORYMIRROR

Neha Sankhe

Inspirational

3  

Neha Sankhe

Inspirational

धन्यवाद... २०२२

धन्यवाद... २०२२

1 min
109

२०२२ राग नाही, रुसवा देखील नाही तुझ्यावर

खूप वाईट प्रसंग दाखवलेस

पण काही सुखद धक्के सुद्धा दिलेस

 

काही लोकांना गमावले

पण लाखमोलाच्या व्यक्तींना जवळ आणलेस


चांगले वाईट अनुभव दिलेस

पण त्यातूनही मार्ग दाखवलेस


दिशाहीन होण्यापासून वाचवलेस 

आणि स्वप्नांना दिशा दिलीस


माणसातले राक्षस रूप दाखवलेस

आणि दाखवलेस माणसातले देवपण ही तूच 


वाईट माणसांकडून खूप काही शिकले

त्यातूनच आपले कोण आणि परके कोण हे उमगले 


आता मात्र,


मागचं विसरून नवीन सुरुवात करू

आनंदी क्षणाना आठवून 

नकोश्या प्रसंगातून धडा घेऊन

नवी पहाट नवा संकल्प करू


इंद्रधनुष्याप्रमाणे स्वतः सोबत दुसऱ्यांचे आयुष्य सुद्धा रंगीबिरंगी करू

नवी पहाट नवा संकल्प करू


नवीन वर्षाचे करूया स्वागत हसून खेळून

चुकले त्यांना माफ करून

चांगले आठवणी जोपासून

नवी पहाट नवा संकल्प करू


जे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे

ते पूर्ण करण्यासाठी धडपड करू

नवी पहाट नवा संकल्प करू


स्वतःचे छंद जोपासू

नव्या साहित्याचे वाचन करू

लेखणी आपली दिवसांगणित वृद्धिंगत करू

नवी पहाट नवा संकल्प करू


छोट्यानंबरोबर वेळ घालवू

काम तर रोजच असतात

घरातल्यान सोबत छानशा गप्पा मारू

नवी पहाट नवा संकल्प करू


धन्यवाद २०२२ तू खूप काही शिकवलेस

हे वर्ष खऱ्या अर्थाने जीवनाचे अर्थ शिकवून गेले


२०२३ तुझे मनापासून स्वागत

जुने सगळे लक्षात ठेवून झालेल्या चुका सुधारत नवीन वर्षाची सुरुवात करू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational