STORYMIRROR

Neha Sankhe

Inspirational

3  

Neha Sankhe

Inspirational

स्वप्न रायगडाच्या पायथ्याशी

स्वप्न रायगडाच्या पायथ्याशी

1 min
205

मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,  

नकळत नजर वर आणि हात जमिनीला टेकले होते,  

स्वराज्याच्या शांततेचे सुंदर गीत कानी पडले होते, 

ते अंधारच जणू मधुर संगीत गात होते  

गडाच्या पायथ्याशी जणू युद्धाचे अवघे रणांगण उभे राहिले होते,  

राज्याच्या त्या पाऊलखुणानी मी धन्य धन्य जाहले होते, 

मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,  


राजे माझे पालखीत विराजमान झाले होते  

सगळेच मावळे घोड्यावर स्वार होऊन राजाच्या मागे धावत होते,  

तो राजमहाल तो तोफखाना ती सदर  तो राजवाडा  

सगळेच स्वागतासाठी सज्ज होते,

जय भवानी जय शिवाजी आवाज माझ्या कानात घुमत होते,  

मी स्वप्नात आज रायगडच्या पायथ्याशी पोहोचली होते,  


आई भवानीच्या मुखावर प्रचंड तेज दिसत होते,  

दिव्यांनी आज अखण्ड रायगड प्रकाशित झाले होते,   

विजयाचे भगवे रायगडावर चढवले जात होते,  

तो नयनरम्य देखावा मी माझ्या हृदयात साठवून घेत होते, 

दगड न दगड जणू विजयाचे पोवाडे गात होते,  

मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,


स्वराज्य प्रेम एकनिष्ठा मातृप्रेम जनसेवा यांनी अवघा किल्ला नटला होता,  

राजाच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला होता,  

विविध पराक्रमाचा साक्षीदार गड माझा भासत होता,  

अंधाऱ्या कित्येक रात्री माझा राजा अन् रायगड जागाच होता,  

सिंहासनावर राजा माझा विराजमान होता,  

आणि मी त्यांच्या चरणापाशी नतमस्तक झाले होते, 

मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational