STORYMIRROR

Neha Sankhe

Others

3  

Neha Sankhe

Others

पाठवणीचे गाठोडे

पाठवणीचे गाठोडे

1 min
165

आज भरलेल्या माझ्या सामानाच्या गाठोड्यात

बालपणीच्या आठवणी शिरल्याच नाहीत,


आईच्या कुशीतली ती उबदार उब मावलीच नाही


त्या घराने दिलेले सुखाचे क्षण गाठोड्यात भरता भरता गाठोड्यातून बाहेर येऊ लागले,


आजीने सांगितलेले ते चांगल्या वाईट आठवणी मावल्याच नाहीत


मैत्रिणी सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण हातात सापडलेच नाहीत,


भातुकलीच्या बाहुल्यान सोबत घालवलेला तो तासन तासाचा वेळ काही गाठोड्यात यायला तयारच नाहीत,


अंगणात उभा असलेला माझा सोबती चाफ्याचे झाड मुळासोबत उपटता आलेच नाही,


त्या प्रेमळ आठवणींचा झरा माझ्या सामानांच्या गाठोड्यात काही मावलाच नाही,


भावासोबत केलेले ते मिनिटा मिनिटाला भांडण गाठोड्यात काही शिरायलाच तयार झाले नाही


रात्री घाबरून बाबांना मारलेली ती मिठी तिचं वजन काही गाठोड्याला पेलवत नाही,


गरजेचं सामान तर सगळच भरलं पण हे सगळं आठवणीच साहित्य कुठल्याच गाठोड्यात सामावलेच नाही,


मग या प्रेमळ आठवणींना मी माझ्या हृदयाच्या एका कप्प्यात सामावून घेतले तेव्हा माझे सामानाचे गाठोडे तुडूंब भरले


तेव्हा माझे पाठवणीचे गाठोडे मला घेऊन जाता आले....


Rate this content
Log in