STORYMIRROR

Neha Sankhe

Others

3  

Neha Sankhe

Others

आठवण

आठवण

1 min
111

सुकलेलं पान आज पुन्हा हिरव झालं  

आठवणींनी आज पुन्हा हृदयात कल्लोळ माजवलं

 

बरसणाऱ्या सरीने मन आज हळूवार मोहरलं 

कित्येक साठवलेल्या आठवणींना जणू पूरच आलं 

भातुकलीच्या खेळातलं छोटासा संसारही आठवलं  

उन्हाचा तडाखा आणि मायेच्या स्पर्शाने मन सुखावलं  


सुकलेल्या पान . . . . 


शाळेतल्या त्या कट्ट्यावरच्या गप्पांनी ओठांवर हसू आणलं  

इतिहासाच्या तासाला नकळत लागलेला डोळा आठवलं  

भांडणाचा रुसवा फुगवण्याचा आनंदाचा काळ अगदीच डोळ्यासमोर आलं  

काळजात काहूर आणि डोळ्यात पाणी तरळलं  


सुकलेलं पान . . . . 


वडिलांचे ओरडणे आईचे मग प्रेमाने थोपटणं  

घरात नुसतेच चिमणीसारखा दिवसभर चिवचिवणं  

टीव्हीसमोर रिमोट साठी भावासोबत भांडणं  

रोजच रात्री चंद्र चांदण्या सोबत गप्पा मारणं  


सुकलेल पान . . . .


ऐन कामाच्या वेळीच अभ्यासाचं पुस्तक हातात पकडणं  

पुस्तक हातातच पकडून मग झोपीही जाणं  

परीक्षेचे रात्री मात्र जागूनच अभ्यास करणं  

बाबांची परी म्हणून घरभर मिरवणं


 सुकलेल पान . . . . . 


आनंदाचा कुठे काय मोजमापच नव्हतं  

चुकांचा सतत पाढाही वाचला जात नव्हतं  

प्रेमाचा झरा ओसंडत होत दुःखाचं सावटही नव्हतं  

आठवणींचं हे काळ कधीच विसरणं शक्य नव्हतं 


सुकलेल्या पान आज पुन्हा हिरव झालं

आठवणीने आज पुन्हा हृदयात कल्लोळ माजवलं


Rate this content
Log in