STORYMIRROR

Umesh Salunke

Romance Others

4  

Umesh Salunke

Romance Others

कुणी कितीही कांही बोलु दे.....

कुणी कितीही कांही बोलु दे.....

1 min
253

कुणी कितीही कांही बोलु दे

कुणी कितीही सांगूं दे

कुणी कितीही जळू दे 

हेंच वचन मला तू दे 

असंच प्रेमात रंग भरू दे

आपल्या प्रेमात शेवटपर्यंत 

साथ तुझी असू दे.....!


    माझ्या साठी तू 

    तुझ्या साठी मी

    माझ्या मनात तुझ्या आठवणी

    तुझ्या मनांत ठेव साठवुनी

     तु जा त्या रंगूवूनी

     मी घेईल समजाऊंनी

     तु घे गोड मानुनी  .....!


कुणी कितीही कांही बोलु दे

कुणी कितीही सांगूं दे

कुणी कितीही जळू दे 

हेंच वचन मला तू दे 

असंच प्रेमात रंग भरू दे

आपल्या प्रेमात शेवटपर्यंत 

साथ तुझी असू दे......!


    तू विश्वासात घे

    तू सहवासात घे 

     तू बंधनात ये

     तू अशीच माझ्या नात्यात 

      बनवून ये.....!

     

कुणी कितीही कांही बोलु दे

कुणी कितीही सांगूं दे

कुणी कितीही जळू दे 

हेंच वचन मला तू दे 

असंच प्रेमात रंग भरू दे

आपल्या प्रेमात शेवटपर्यंत 

साथ तुझी असू दे ......!


    तुझ माझं एक घर असू दे

    माझ्या जीवनात तूंच दिसू दे

    तुज्या आयुष्यात कुठलीच कमी

    नसू दे चढ उतार कितीही असू दे

    तूच फक्त चंद्र सूर्य असे पर्यंत

     माझीच सदैव असु दे.....!


     तुझचं नावं ओठांवर राहूं दे

     माझ्या हृदयात तुझच नावं कोरू दे

     अशीच भावना निर्माण होऊ दे......!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance