कुंकवाचे ओझे
कुंकवाचे ओझे
तडफडणे,झिजणे,नको त्यागही करणे नको,
तुझ्या कुंकवाचे ओझे माझ्या कपाळी नको,
माझ्या मुक्त भावनांना बंदिस्त तू केले,
जगत असतानाही मी रोज मरत गेले,
स्वातंत्र्य हिरावूनही तू अन्याय माझ्या वर केले,
त्या दु:खी आठवणी आता आठवू नको..
तुझ्या कुंकवाचे ओझे.....
संशयाचे शब्द काळजात तू मारले,
आनंत यातना सहन करुन जीवन तुझे सावरीले,
अन् वरती तू माराचे घास मला चारीले,
तुझ्या जीवघेण्या माराचे वृण अंगावरी आता नको,
तुझ्या कुंकवाचे ओझे.....
कुंकू तुझे देऊनी तू मुकं मला केले,
रोजच मी त्रासाने अश्रू गाळत गेले,
तडफडले मी अन् माझे मनच मरुन गेले,
मनच मेले आता तुझा पिंजरा मला नको,
तुझ्या कुंकवाचे ओझे.......
