कथा संसाराच्या
कथा संसाराच्या
कथा संसाराच्या अनेक
शब्दात मांडणी होईल का
किती वाद किती विवाद
जन्मोजन्मी सांगा जोडी टिकेल का
एक आयुष्य तर सोडा
वर्षही सुखात जात नाही
कहाणीतच दोन जिवांचे नाते
एकमेकांसोबत प्रेमाने राही
द्वेषासोबत सुखाने राहण्या शिकेल का
किती वाद किती विवाद
जन्मोजन्मी सांगा जोडी टिकेल का
मंगलाष्टाका वचन आशीर्वाद
गेले यांचे सर्वच वाया
वैज्ञानिक जग होऊन आता
संस्काराचीही निघाले माती कराया
बंधने तोडून बंधनात हे बांधले जाईल का
जन्मोजन्मी सांगा जोडी टिकेल का
