STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

कष्टकरी बाप

कष्टकरी बाप

1 min
381

बाप उन्हाच्या कहरात 

बाप तळपत्या रानात 

राब राबतो, कष्टतो 

विश्वास त्याच्या मनगटात 


बाप अनवाणी पायानी 

हिंडे फिरे रानी वनी 

निघे भाकरीच्या शोधात 

इच्छा मनात बाळगुणी 


बाप शेताच्या रानात 

तप्त मातीच्या सोबत 

कष्ट दिवस रात्र करतो 

पीक घामाचे जगात 


भर उन्हात अंगाची 

आग,आग जीवाची 

झाडे बांधावरली सारी 

देई माया सावलीची 


गावच्या छोट्या तळ्यात 

पाणी वाटे त्यास अमृत 

त्याच्या अनोख्या चवीने 

जीव होई शांत तृप्त 


गावची मिरची भाकर 

लागे न्यारी चवदार 

खातो मोठ्या आवडीने 

पोट भरते पोटभर 


बाप सुखाचा आधार 

बाप दु:खात आधार 

चारी दिशाच्या जागेत 

त्याचे प्रेम भरपूर 


बाप जीवाची सावली 

बाप हृदयाची माऊली 

त्याच्या विश्वव्यापी संस्काराने 

गुरूकिल्ली जीवनास लाभली 


बाप मोठी हिम्मत

बसल्या जागी किमत 

त्याचे छत्र कुटूंबात 

अनमोल ठरले जगात 


गावचे हिरवे शिवार 

रानमेवा त्याच्यासाठी 

भाज्या,फळे आणतो 

भूकेल्या व्याकूळ जीवांसाठी 


व्हावे श्रमाचे मोल 

अर्थ असावा जगण्याला 

कष्टाचे सार्थक व्हावे 

समाधानी सुंदर आयुष्याला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational