कष्टाविना काही नाही
कष्टाविना काही नाही
लढावे लबाडा हरवण्या कधीही
लढाई नसावी मिरवण्या कधीही
तयारी असावी श्रमाची तुझीही
यशाच्या कमानी फिरवण्या कधीही
असावी सदाची घराची तयारी
स्वतःला खुशीने गिरवण्या कधीही
कशाला रहावे गरीबीत तू मी
झटावे गरीबी जिरवण्या कधीही
आयत्या पिठाला महत्व कशाला
श्रमाची किंमत करावी कधीही
