कष्टाचा दिवा
कष्टाचा दिवा
एका एका स्वप्नाला माझ्या
मेहनतीच्या मातीत मळून
एक एक पणती बनवली
मी जिवाचा आकार देऊन
माझा मातीचा संसार
माझा मातीचा ग दिवा
तुझं घर उजळाया
एकतरी घ्याया हवा
तुझ्या दिव्याचा प्रकाश
माझ्या पोटा छोटी आस
तुझी दानत ना छोटी
देईल मला दोन घास
कष्टाला वय नसे...
नसे त्याची लाज
झोपडीत स्वर्ग माझा
तरी सुखात मी निजे
जरी उशाखाली खडे
