STORYMIRROR

Ranjeeta Govekar

Others

3  

Ranjeeta Govekar

Others

तू ये बनोनी

तू ये बनोनी

1 min
12.1K

तू ये बनून कधी ऋतू 

कधी मेघ सावळा....

दाटूनी डोळा साठही 

कधी होऊन बावरा...


कधी तूच माझे गीत हो 

माझ्या मनीचा मीत हो

जे कधीच कुणी ना जाणिले 

त्या हृदयाची तू ... प्रित हो...


कधी होऊन मग झुळूक ये

कधी सांज वेळ होऊन ये....

धरणी क्षितिजाच्या मिलना 

साक्षीदार तू ... होऊन ये....


कधी माझा नभीचा चंद्र तू 

कधी चांदणे शिंपीत ये....

ज्या रात्रीला प्रहर नसे

अशी रात्र तूच होऊन ये....


माझीच मी ना राहिले 

तु घेऊनी मजलाच ये

श्वासाचे बंधन तोडून 

कान्हा तू मजला मुक्ती दे..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन